स्थापना: दि. ०५/०२/१९५३
मेशी ता.देवळा जि.नाशिक
grampanchayatmeshi453@gmail.com
सुचना :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
मेशी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात पूर्व भागातले मुख्य व एक प्रगतशील असे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ५६७३ असून गावाचे क्षेत्रफळ २०८१ चौरस किमी. आहे. गावामध्ये प्राथमिक शाळा ५, माध्यमिक शाळा १, महाविद्यालय १, अंगणवाडी ११, समाजमंदिर ४, वाचनालय १ अशा शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समाजमंदिराचा वापर केला जातो.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून येथे प्रामुख्याने कांदा डाळिंब मका बाजरी ही पिके घेतली जातात. या पिकांमुळे गावकऱ्यांचे उपजीविकेचे साधन बळकट झाले आहे.
मेशी ग्रामपंचायतीत (स्थापना: दि.०५/०२/१९५३) विविध शासकीय योजना टप्प्याटप्प्याने राबवल्या गेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावाने स्वच्छतेबाबत चांगली प्रगती साधली आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना राबवून गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय सुकर करण्यात आली आहे. तसेच घरकुल योजनेतून गरजू लाभार्थींना घरकुल दिले आहेत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून गावाचा विकास घडवून आणला जातो. ग्रामपंचायतीतील निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आज मेशी हे गाव स्वतःच्या मेहनतीवर व लोकसहकार्याच्या बळावर प्रगतिच्या दिशेने वाटचाल करीत असून नाशिक जिल्ह्याच्या नकाशावर आपले स्थान अधोरेखित करत आहे.
मेशी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय नाशिकपासून सुमारे ८५ किमी अंतरावर व तालुका मुख्यालय देवळा पासून सुमारे ९ किमी अंतरावर वसलेले आहे. प्रशासकीय दृष्ट्या मेशी हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र असून पंच्कोशी तील मुख्य बाजारपेठ देखील आहे.
मेशी गावाचा पिन कोड ४२३१०२ असून पोस्टल सेवा देवळा मुख्य टपाल कार्यालय व विभागीय कार्यालय मालेगाव मार्फत पुरवली जाते.
गावाच्या सभोवती अनेक गावे आहेत. त्यामध्ये खडततळे खालप पिंपळगाव खुंटेवाडी , डोंगरगाव वाखारी देवपूरपाडे ही महत्त्वाची गावे आहेत. या गावांशी मेशी गावाचा सामाजिक व आर्थिक संबंध दृढ आहेत.
मेशी गावापासून मालेगाव , सटाना ,मनमाड ,येवला इ. मोठे शहर जवळ आहेत
मेशी हे देवळा तालुक्यातील एक मोठं व प्रगत गाव असून येथील लोकजीवन साधेपणावर, श्रमप्रधान जीवनशैलीवर आणि पारंपरिक संस्कृतीवर आधारलेलं आहे. गावातील बहुसंख्य लोक शेती व्यवसायाशी निगडित असून तब्बल 1,830 कुटुंबे शेती करणारी आहेत.उर्वरित लोक लघुउद्योग, सेवा क्षेत्र तसेच इतर उपजीविकेत कार्यरत आहेत.
गावामध्ये सामाजिक आणि धार्मिक परंपरांचा मोठा ठेवा जपला जातो. वर्षभर विविध उत्सव, जत्रा व देवस्थानांवरील कार्यक्रम ग्रामस्थांना एकत्र आणतात. यामुळे गावामध्ये आपुलकी, एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ होते.
शिक्षणाच्या दृष्टीने गावात प्राथमिक शाळा असून मुलांना मूलभूत शिक्षण गावातच मिळते. पाणीपुरवठा, रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे गावाचा विकास झपाट्याने पुढे होतआहे.
मेशीच्या लोकजीवनात कृषिप्रधान परंपरा आणि सामाजिक एकोपा हे दोन स्तंभ विशेष ठळकपणे दिसून येतात. ग्रामीण संस्कृतीसोबत प्रगतीकडे नेणारी पावले टाकणारे हे गाव आज नाशिक जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील ग्रामदैवत जगदंबा माता गावकऱ्यांची अखंड श्रद्धास्थाने आहेत. येथे दरवर्षी साप्ताह, यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे गावाला जगदंबा नगरी म्हणून ओळख आहे. गावात अक्षय तृतीये च्या वेळी सलग सात दिवस भोहाडा होतो.
हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही मंदिरे सण-उत्सवांच्या काळात ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे व संवाद साधण्याचे केंद्रस्थान ठरतात.तसेच बाबावाडी येथील हनुमान मंदिर पहाण्या जोगे आहे
खंडेराव महाराज मंदिर - हे मंदिर मेशीतील मल्हारवाडी मध्ये आहे.
शेती क्षेत्र – मेशी कांदा , बाजरी ऊस डाळिंब व मका उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथे पसरलेली हिरवीगार शेती पाहण्यासारखी आहे. शेती हा ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे.
जलसंधारण प्रकल्प –मेशी गावाच्या बाजूला डोंगर असल्याने गावात पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारणाच्या उत्तम उपाययोजनांमुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसते. मनरेगा (MREGS) व अटल भूजल योजनेअंतर्गत मातीतळे, गावतळे, शेततळे उभारण्यात आले आहेत. यामुळे शेतीला तसेच गावकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
सर्वधर्म समभाव चे दर्शन ;- मेशी गावात सर्व जाती धर्माचे लोक आनदाने व प्रेमाने एकत्र राहतात व आपले सण उत्सव साजरे करतात .त्यातून त्याच्या एकतेते दर्शन दिसते.
स्मार्ट ग्राम पुरस्कार २०२३/२४
तंटामुक्त गाव
संत गाडगेबाबा गरम स्वच्चाता अभियान
निर्मल कृषी पुरस्कार
निर्मल ग्राम पुरस्कार
1.श्री.श्रीराम वैराळ (तलाठी)
2.श्री. हेमंत पंढरीनाथ पगार (पोलीस पाटील)
३.श्री. विजय जाधव (सहाय्यक कृषी अधिकारी)
४.श्रीमती.कल्पना विजय जाधव (BLO)
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
२०८१.० चौ. किमी
🏢 वार्ड संख्या
५
👥 पुरुष संख्या
२९६४
👥 स्त्री संख्या
२७०९
👥 कुटुंब संख्या
११९५
👥 एकूण लोकसंख्या
५६७३